Playstore Icon
Download Jar App
Digital Gold

या सणासुदीच्या हंगामात भेटवस्तू म्हणून सोने खरेदी करण्याची 5 कारणे - जार ॲप

December 28, 2022

आजकाल जो तो उठतो आणि सोने खरेदी करतो किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करतो. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल, असे का ? FOMO झोनमध्ये राहू नका. हे समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

सणवार म्हटले की, रोषणाई, फटाके, भेटवस्तू देणे, नवे कपडे खरेदी करणे, फुलांची खरेदी, खाद्यपदार्थांची रेलचेल अशा सगळ्या गोष्टी ओघाने येतातच. सणांच्या काळात एक वेगळाच उत्साह जाणवत असतो.

नव्या वर्षासह आता पुन्हा एकदा सणांचे महिने सुरु होतील, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळी यांसारखे अनेक सणवार हा हा म्हणता तोंडावर येतील, याकाळात अनेक जण सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात.‍

पारंपरिक सोन्याचे प्रकार जसे की, सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी आणि सोन्याचे बार यांच्यासह अलिकडच्या दशकांमध्ये, आपल्याकडे  सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अधिक पर्याय आहेत उदा. गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड बाँड्स आणि डिजिटल गोल्ड.

भारतात सोन्याविषयी विशेष आकर्षण आहे, भारतातील घरोघरी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात,  घरात मुल जन्माला आलं, सण आला किंवा लग्न असलं तर शुभाशीर्वाद म्हणून आणि मौल्यवान भेट म्हणून सोनं दिलं जातं, सोन्याची गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. एकूण काय या 24-कॅरेटच्या, चमकदार सोन्याची भारतात प्रचंड मागणी आहे.  

‍पण शुभ प्रसंगी लोक सोने का खरेदी करतात? ‍

भारतात, सोन्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे - सर्व धातूंमध्ये सर्वोच्च स्थान आहे.

 जागतिक स्तरावर वापरल्या जाणार्‍या सोन्यापैकी सर्वाधिक सोने भारताकडे आहे.या गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटत नसेल. नाही का ?

कारण सोने हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, संपत्तीचे प्रतीक आहे.

●‍पवित्र आणि शुद्ध - हिंदू पौराणिक कथेनुसार, सोने पवित्र आणि शुद्ध मानले जाते. यात उच्च भावनिक मूल्य आहे. हे आपल्याला जवळ आणते आणि लोकांमधील बंध मजबूत करते.

●‍सकारात्मकतेचा रंग - सोन्याचा आनंददायी रंग सकारात्मक ऊर्जा पसरवतो आणि बरे होण्यास मदत करतो असे मानले जाते.

●‍‍‍‍समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक- धनत्रयोदशी आणि दिवाळी दरम्यान सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. काण यादिवशी सोने खरेदी म्हणजे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन आणि समृद्धीचे देवता यांना घरी आमंत्रित करण्यासारखे मानले जाते.

सांस्कृतिक आणि भावनिक भागाव्यतिरिक्त, भारतीयांना सोन्याचे वेडे समजण्याची इतर अनेक कारणे आहेत:

‍●‍‍‍ लिक्विड कॅशसाठी उपयुक्त - सुरक्षा किंवा मालमत्ता म्हणून, सोने लिक्विड ॲसेट आणि पोर्टेबल आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत ते कधीही रोख पैसे मिळवून देऊ शकते. 

●‍चांगली गुंतवणूक - सोने ही एक अशी संपत्ती  आहे  ज्याच्या मूल्यात सातत्याने वाढ होत आहे, ज्यामुळे ती एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. गेल्या पाच वर्षांत सोन्याने 20% पेक्षा जास्त परतावा दिला आहे ज्यामुळे सोन्यात गुंतवणूक हे कमी जोखीमेचे सिद्ध होते. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या गुंतवणुकीचा वाटा एखाद्या व्यक्तीच्या निव्वळ गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये 5% ते 10% असावा.

●‍उत्कृष्ट भेटवस्तू पर्याय - सोने भेट देणे हा बहुतेक समारंभ आणि परंपरांचा अविभाज्य भाग बनतो. पैशाचा मुख्य स्त्रोत असण्याव्यतिरिक्त ते भाग्यवान मानले जाते. सोने भेट देणे हा आपल्या देशात भेटवस्तूचा सर्वोच्च प्रकार मानला जातो, जो एखाद्या व्यक्तीचे मूल्य आणि हेतूची शुद्धता अधोरेखित करतो.

अलीकडे डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट ॲप द्वारे - सोने भेट देणे आता सोपे आणि त्रासमुक्त झाले आहे.

 जार ॲपद्वारे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्या घरात सोने खरेदी करून तुमच्या प्रियजनांना अप्रतिम किमतीत भेटवस्तू देखील पाठवू शकता. ‍

डिजिटल गोल्डद्वारे तुमच्या प्रेमाचा काही भाग त्यांच्यासोबत शेअर करा. डिजिटल गोल्डमधील गुंतवणूकीबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी डिजिटल गोल्ड गाइड पहा.‍

या सणासुदीच्या हंगामात तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करून गिफ्ट का करावे? ‍

तुम्ही डिजिटल गोल्ड जारमधून खरेदी का करावे, सविस्तर पहा 

‍‍●डिजिटल गोल्ड्स सगळ्यात मोठा लिक्विड कॅश देणारा घटक आहे.

डिजिटल सोने कुठेही आणि केव्हाही सहज खरेदी आणि विक्री करता येते. भविष्यात सोन्याचे पूर्ण पुनर्विक्री मूल्य मिळविण्यासाठी तुम्हाला डीलरला भेट देण्याची किंवा अनेक वर्षे सुरक्षित सोने खरेदी खाते ठेवण्याची गरज नाही.

●‍₹1‍ पासून सोने उपलब्ध 

या सणासुदीच्या हंगामात लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या बाजारपेठांमध्ये जाण्याची कोणतीही अडचण नाही. सोन्यात गुंतवणूक करताना, तुम्हाला किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करणे आवश्यक आहे, ज्याच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असतात.

तर, डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणे खूप परवडणारे आहे आणि ते ₹1 पेक्षा कमी किंमतीत खरेदी आणि विकले जाऊ शकते. हे परवडणारे आहे आणि मर्यादित उत्पन्न असतानाही तुम्ही डिजिटल सोन्यात सहज गुंतवणूक करू शकता.

●‍24 कॅरेट शुद्ध सोने, बाजारापेक्षा स्वस्त

सोन्याचे दागिने खरेदी करताना, तुम्हाला केवळ सोन्याची किंमतच नाही तर शुल्क आणि अतिरिक्त कर देखील द्यावे लागतात.

तुमच्या दागिन्यांच्या डिझाइनवर आधारित ज्वेलर्स 7% ते 25% पर्यंत कुठेही शुल्क आकारतात. जर निवडलेल्या दागिन्यांमध्ये मौल्यवान हिरे आणि रत्ने असतील तर किंमत वाढते आणि त्याचे मूल्यदेखील सोन्याच्या किमतीमध्ये समाविष्ट केले जाते.

जेव्हा तुम्ही सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करता तेव्हा तुम्हाला त्या जडलेल्या दागिन्यांची किंमत कधीच गोळा करण्याची किंवा पुनर्संचयित करण्याची गरज नसते

डिजिटल सोन्यासह, तुम्ही फक्त शुद्ध सोन्याचा व्यापार करता, जे 24 कॅरेट सोन्याचे असते. तुम्ही खर्च केलेली एकूण रक्कम फक्त सोन्यात गुंतवली जाते. खरेदी करताना तुम्हाला फक्त 3% GST भरावा लागेल.

●‍सुरक्षित गुंतवणूक 

अनेक लोक डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्यास पटकन तयार होत नाहीत कारण ही नवीन संकल्पना आहे आणि त्यांना या क्षेत्रातील ज्ञानाचा अभाव आहे. पण काळजी करू नका, गुंतवणूक पर्याय म्हणून डिजिटल सोने सुरक्षित आहे.

तुमच्या खात्यात जमा झालेल्या प्रत्येक ग्रॅम सोन्याला वास्तविक सोन्याचा आधार असतो. याचा अर्थ तुम्हाला कोणत्याही वेळी कोणताही धोका नाही.

● स्टोरेजची कोणतीही चिंता नाही

भारतीय घरांमध्ये, वडीलधाऱ्यांना लॉकरमध्ये भौतिक सोने ठेवताना पाहिले आहे. ते खूप धोकादायक आहे कारण ते चोरीला जाण्याची भीती नेहमीच असते.

हे टाळण्यासाठी, ते दीर्घ मुदतीसाठी बँक लॉकरमध्ये ठेवले जाते आणि त्यानंतर नोंदणी शुल्क, वार्षिक शुल्क, सेवा शुल्क इत्यादी स्वरूपात स्टोरेज खर्च येतो.

डिजिटल गोल्ड तुम्हाला दीर्घकालीन खर्च आणि स्टोरेज समस्यांपासून मुक्त होण्यास अनुमती देते. तिजोरीसाठी शूल्क नाही. दर्शनी मूल्यावर विमा आहे.

सोन्यात गुंतवणूक करताना डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे हा स्मार्ट पर्याय कसा आहे. याची अधिक माहिती घ्या.

स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना जार ॲपद्वारे डिजिटल गोल्ड भेट देऊन या सणासुदीचे दिवस आणखी खास करूयात. आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या या गुंतवणुकीचा आनंद घ्या आणि अमर्याद परताव्याची मजा घ्या 

जार ॲपद्वारे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक कशी त्रासमुक्त आहे ते पहा आणि आजच  जार ॲप डाऊनलोड करा !  आणि तुमचा बचत आणि गुंतवणूकीचा प्रवास सुरू करा!

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.