Playstore Icon
Download Jar App
Financial Education

आर्थिक साक्षरतेतील लिंगभावात्मक अंतर कसे कमी कराल - जार

December 29, 2022

सर्वेक्षणे असे सूचित करतात की पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत परंतु स्त्रियांना मागे ठेवणारे कोणते घटक आहेत? अधिक जाणून घेण्यासाठी हे वाचा

गेल्या दशकात, शिक्षण, कामाचे ठिकाण आणि सामाजिक विकास यासारख्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांनी प्रचंड टप्पे गाठले आहेत.

त्या पुरुषांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करत असताना, अजूनही बरेच काही साध्य करायचे आहे, विशेषत: आर्थिक साक्षरतेच्या संकल्पनेच्या आसपास आणि ती तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात कशी मदत करू शकते या संदर्भात. 

इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ फायनान्शिअल एज्युकेशनच्या तपशीलवार अभ्यास आणि संशोधनामध्ये, असे आढळून आले आहे की मोठ्या प्रमाणात  महिलांना आर्थिक लोकसंख्येच्या व्यापक स्तरावरील ज्ञान आणि जागरुकतेच्या समान पातळीवर राहण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. 

आपल्याला माहित आहे की, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात आणि कमी उत्पन्न आणि किमान पेन्शनसह त्यांचे व्यावसायिक आयुष्य कमी असते.

या बाबी लक्षात घेतल्यास आर्थिक साक्षरतेचा अभाव पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रभावित करतो.

स्त्रिया त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना कमी किंवा कोणतीही बचत नसण्याचा धोका जास्त असतो.

असाही अभ्यास करण्यात आला आहे की, ज्या स्त्रिया निवृत्तीच्या वयात असताना विवाहित नाहीत किंवा घटस्फोटित आहेत त्यांचे कायमस्वरूपी उत्पन्न कमी आहे आणि श्रमशक्ती संलग्नतेचे प्रमाणही अल्प दिसून आले आहे. 

असे मानले जात होते की स्त्रिया तुलनेने जोखीम टाळतात आणि अशा प्रकारे त्या पुराणमतवादी गुंतवणूक करतात आणि त्यांना त्यांच्या आर्थिक वर्तनावर कमी आत्मविश्वास असतो.

आर्थिक साक्षरतेचा अभाव हे निश्चितपणे स्त्रियांच्या जीवनातील कमी संपत्तीच्या पातळीला कारणीभूत ठरते, विशेषत: त्यांचे निवृत्तीचे वय जवळ आल्यावर.

लिंगभावात्मक विषमता मान्य करणे: काळाची गरज

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की पुरुष आणि महिलांचे वित्तविषयक शिक्षणाचे स्तर भिन्न आहेत.

स्त्री-पुरुषांच्या साक्षरतेच्या पातळीत तफावत आहे आणि ती भरून काढण्याची लढाई सुरू करण्यासाठी ती मान्य करणे आवश्यक आहे.

‍महिलांना बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींबद्दल जागरुक बनवण्याचे उद्दिष्ट असलेल्या विकासाची धोरणे आहेत.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीवादासाठी झटत असलेल्या युगात, आर्थिक क्रियांमध्ये भाग घेण्यासाठी आणि स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी 'समानतेने' आर्थिक निर्णय घेण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही समान आणि पुरेसे साक्षर असणे आवश्यक आहे. 

कुटुंबात महिलांना असलेला महत्त्वाचा आणि तरीही क्लिष्ट दर्जा लक्षात घेता, अनेकांना अजूनही गृहिणी बनणे हेच प्रथम आहे, बचत खाते उघडणे किंवा त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करणे हे त्यांच्या समीकरणात असू शकत नाही.

विशेषत: भारतातील ग्रामीण भागातील स्त्रिया दैनंदिन घरातील कामांपेक्षा त्यांच्या आर्थिक सुदृढतेला प्राधान्य देत नाहीत.

त्यासोबतच अनेक अतिरिक्त घटक आहेत जे वित्तीय संस्थांच्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक कठीण बनवतात. 

महिलांच्या आर्थिक वर्तनावर परिणाम करणारे घटक 

फायनान्शियल इंडस्ट्री रेग्युलेटरी अथॉरिटी, किंवा FINRA च्या अभ्यासानुसार , महिला त्यांच्या पुरुष समवयस्कांच्या तुलनेत कमी आर्थिकदृष्ट्या साक्षर असतात .

‍सहस्राब्दी पुरुषांच्या तुलनेत केवळ १८ टक्के महिलांनी उच्च पातळीवरील आर्थिक साक्षरता दाखवली.

याबाबत सर्वेक्षण केले असता, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांना याचा सर्वाधिक फटका बसला.

भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार असताना त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? एका सर्वेक्षणाच्या आधारे आम्ही खालील मुद्दे शोधून काढले.

वित्तीय संस्थेपर्यंतचे अंतर आणि वाहतूक दुर्गमता

समाजातील कामगार बाजाराची कमकुवत स्थिती

योग्य दस्तऐवज आणि अद्ययावत कागदपत्रे नसणे

कौटुंबिक काम आणि जबाबदाऱ्या त्यांना रोखून धरतात

आर्थिक शिक्षण आणि आत्मविश्वासाचा अभाव 

वित्तीय संस्थांबद्दल असलेली मानसिकता आणि दृष्टीकोन

परंतु आर्थिक ज्ञान केवळ दोन तृतीयांश आर्थिक साक्षरतेची कथा सांगते. उरलेला तिसरा भाग ? 

आत्मविश्वास.

आर्थिक साक्षरतेच्या चाचण्यांची रचना बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे करण्यात आली होती. उत्तर निवडींपैकी एक "माहित नाही" असा पर्याय समाविष्ट होता. 

नॅशनल ब्युरो इकॉनॉमिक रिसर्चच्या अहवालानुसार ,असे दिसून आले आहे की आर्थिक साक्षरता चाचण्यांमध्ये महिलांनी त्यांच्यासोबतच्या पुरुषांपेक्षा अनेक प्रकारे खराब कामगिरी केली आहे.

महिलांचे अधिक प्रश्न चुकतात आणि जेव्हा त्यांना निवड दिली जाते तेव्हा ते "माहित नाही" पर्याय निवडतात. 

परंतु त्याच परिस्थितीत जेव्हा “माहित नाही” पर्याय असलेली प्रश्नावली उपलब्ध नव्हती, तेव्हा स्त्रियांनी बहुधा त्यावेळी उपलब्ध असलेले उत्तर निवडल्याचे दिसून आले. 

दुसर्‍या शब्दात हे सूचित करते की महिलांमध्ये सांख्यिकीयदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमी आर्थिक साक्षरता आहे, परंतु प्रत्यक्षात ते असले तरीही, त्यांना याबद्दल आत्मविश्वास नाही.

‍आर्थिक साक्षरतेमध्ये लिंगभावात्मक अंतर कायम आहे आणि त्यातील एक तृतीयांश महिलांमध्ये आर्थिक बाबतीत कमी आत्मविश्वास दिसून येतो. 

गुंतवणुकीतील जोखीम विविधीकरणासंबंधीच्या प्रश्नांसाठी, फक्त ३०% पुरुषांच्या तुलनेत ५५% महिलांनी "माहित नाही" निवडले.

३४% महिलांच्या तुलनेत ६२% पुरुषांनी योग्य उत्तर दिले. अशा प्रकारे, ते अंदाजे २८% पॉइंट अंतर बनवते.

नंतर त्याच लोकांना जोखीम विविधीकरणावर समान प्रश्नाचे उत्तर निवडण्यास भाग पाडले गेले, ८२% पुरुषांनी बरोबर उत्तर दिले, ७३% स्त्रियांच्या तुलनेत ९ टक्के गुणांचे अंतर आहे.

यावरून असा निष्कर्ष काढला की, स्त्री-पुरुष अंतर कमी करण्यामागे इतर घटक कारणीभूत आहेत, त्यापैकी एक म्हणजे स्त्रियांमधील आत्मविश्वासाचा अभाव .

ही एक गंभीर चिंतेची बाब आहे, कारण संशोधकांच्या म्हणण्यानुसार महिलांचे आर्थिक ज्ञान वाढवणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे त्यांना लक्ष्य करून सुद्धा "जर महिला आणि पुरुष यांच्यात आत्मविश्वासातील फरक कायम राहिल्यास आर्थिक साक्षरतेतील लिंगभावात्मक अंतर कमी करण्यासाठी पुरेसे नाही."

महिलांच्या मोठ्या आर्थिक कल्याणातील अडथळे: कमी आर्थिक ज्ञान, आत्मविश्वास आणि परिणाम

 • स्त्रियांना अधिक आर्थिकदृष्ट्या अद्ययावत करण्याची आवश्यकता का आहे हे सिद्ध करण्यासाठी लिंगभावात्मक फरक महत्त्वाची भूमिका बजावतात.

 • सर्व संशोधन असे दर्शवितात की एखादा देश विकसित असला किंवा अजूनही विकसित होत असला तरीही, सर्व देशांतील पुरुषांच्या तुलनेत महिलांना वित्तविषयक ज्ञान आणि जागरूकता कमी आहे.

 • ज्या स्त्रिया योग्य शिक्षण घेत नाहीत आणि कमी उत्पन्न असलेल्या स्त्रिया अशा आहेत ज्यांना नुकत्याच पदवीधर झालेल्या आणि कमावणाऱ्या तरुणींच्या तुलनेत सर्वात जास्त आर्थिक साक्षरतेची समज नसते. 

 • स्त्रिया, आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणुकीबद्दल केवळ कमी जागरूक आणि साक्षर दिसतातच असे नाही तर जेव्हा त्यांना आर्थिक समस्या भेडसावतात तेव्हा त्यांच्या वागण्यातही रस दिसत नाही. त्यांची कौशल्ये आणि वित्तविषयक ज्ञान या दोन्ही बाबतीत ते पुरुषांपेक्षा कमी आत्मविश्वास बाळगतात.

 • अनेक आर्थिक बाबींमध्ये, जसे की आर्थिक उत्पादनांमध्ये बचत करणे किंवा गुंतवणूक करणे, स्त्रिया पुरुषांपेक्षा कमकुवत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे बहुधा छोटे व्यवहार करण्याची प्रवृत्ती असते जी त्यांना शेवटपर्यंत सामना करण्यास मदत करते. याचे कारण असे की पुरुष आणि स्त्रिया यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत फरक आहे, विशेषतः त्यांच्या कमी उत्पन्नाच्या संदर्भात.

 • महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असले तरीही निवृत्तीसाठी बचत करणे हे पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी प्राधान्य नाही. विकसनशील देशांमध्ये, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त बचत करतात परंतु अनौपचारिकपणे त्यांना चक्रवाढ किंवा व्याजदर क्रेडिट्सपासून दूर ठेवले जाते. 

 • मोठे आर्थिक निर्णय घेताना- महिलांचा आत्मविश्वास कमी असतो. जर निर्णय हा किराणा सामान किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासारख्या नित्याच्या घरगुती वस्तूंबाबत असेल तर यात महिलांचा सहभाग असतो. दुसरीकडे, कार खरेदी, गृहकर्ज आणि विमा यासारख्या प्रमुख आर्थिक निर्णयांमध्ये पुरुषांचा सहभाग होता.

 • वर नमूद केलेली सर्व कारणे महिलांच्या आर्थिक दुर्बलता या वित्तीय आणि आर्थिक संधींच्या सुलभतेमध्ये लिंगभावात्मकतेमुळे भेडसावणाऱ्या अडथळ्यांचे प्रतिबिंब कसे आहे हे दर्शवतात.

 • विवाहित महिलांनी घराची काळजी घेणे आणि नित्याचे वित्त व्यवस्थापित करणे अपेक्षित असले तरी त्या आर्थिक बाबींबाबत मर्यादित ज्ञानापुरत्या मर्यादित राहतात.

 • ही तफावत भरून काढण्यासाठी, महिलांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक आणि वित्तीय संधी आणि वित्तसंबंधित शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील लिंगभावात्मक असमानतेतील आव्हाने आणि संबोधित करणारी धोरणे विकसित केली पाहिजेत.

हे कोडे सोडवण्यासाठी धडपड 

आर्थिक साक्षरतेमध्ये लिंगभावात्मक अंतराची समस्या वय, शिक्षणाची पातळी, विवाहाची स्थिती आणि उत्पन्नाच्या पातळीच्या लोकसंख्येच्या पलीकडेही आहे.

संशोधकांनी धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जी विकास आणि अंमलबजावणी प्रक्रियेत भागधारकांना आणि इतरांना मदत करू शकतील. 

शिफारसी खालीलप्रमाणे आहेत:

 1. महिलांना आर्थिक विषयक योग्य शिक्षणापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी अस्तित्वात असलेले अडथळे ओळखणे आणि त्यांचे विश्लेषण करणे जे त्यांना सांस्कृतिक सामाजिक आणि कायदेशीर नियमांव्यतिरिक्त त्यांची आर्थिक जागरूकता सुधारण्यास मदत करेल जे स्त्रियांना स्वतंत्र होण्यासाठी मर्यादित शिक्षण संधींना तोंड देईल आणि आर्थिक व्यवस्थापन कौशल्य प्राप्त करून देईल. 

 1. लोकसंख्येच्या आधारावर महिला आणि मुलींच्या विशिष्ट विषय गटांना लक्ष्य केले जाणारे धोरण प्राधान्ये ओळखा आणि संबोधित करा .

 1. महिलांच्या आर्थिक गरजा आणि आवश्यकता ओळखून त्यांना आर्थिक, आत्मविश्वास याविषयी माहिती द्या आणि सर्वसमावेशक धोरणे बनवा ज्यामुळे त्यांना अधिक चांगली बचत करण्यात मदत होईल, आर्थिक निर्णय घेता येईल, घरातील आर्थिक निर्णय घेता येतील आणि माहिती आणि मार्गदर्शन सहज मिळू शकेल.

 1. भागधारक - सार्वजनिक, खाजगी आणि नागरी संस्थांमध्‍ये सहभाग आणि समन्वय वाढवणे तसेच लिंगभावात्मक असमानता आणि आर्थिक साक्षरतेशी संबंधित समस्या अधोरिखित करा. 

 1. महिला आणि मुलींना आर्थिक शिक्षण लागू करण्यासाठी आणि देण्यासाठी  शाळा, कामाची ठिकाणे, समुदाय आणि महिला नेटवर्कमध्ये 'शिकवण्यायोग्य मोमेंट्स' आणि शिकण्याचे संदर्भ शोधा. 

आर्थिक साक्षरतेबाबत स्त्री-पुरुषांमधील अंतर वाढवण्यासाठी केवळ आर्थिक ज्ञानाचा अभावच कारणीभूत ठरत नाही.

कमी उत्पन्न आणि आर्थिक संधी देखील एक भूमिका बजावतात. आत्मविश्वास आणि भूमिका सहभाग हे दोन घटक आहेत जे लिंगभावात्मकतेमधील आर्थिक साक्षरतेच्या दरावर देखील परिणाम करतात. 

महिलांसाठी आर्थिक साक्षरता का आवश्यक आहे हे वरील सर्व कारणे स्पष्ट करतात. आणि त्याची आत्ता गरज आहे!

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.