Playstore Icon
Download Jar App

यंदाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर रिफंड मिळाला का ? हा पैसा चातुर्याने गुंतविण्याचे 5 मार्ग जाणून घ्या!

December 28, 2022

2021 ITR/ इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर रिफंड/परतावा म्हणून मिळालेला पैसा योग्य पद्धतीने वापरला जाऊन तुम्हाला उपयोगी पडेल याची खात्री करून घेण्यासाठीचे 5 मार्ग.

अगदी बरोबर, तुमच्या खात्यात जमा झालेला पैसा हा नक्कीच समाधानकारक विषय असू शकतो! परंतु, चांगले काय? तर वार्षिक इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये भरलेला TDS अर्थात स्त्रोतावर वजा करून घेतला जाणारा कर परत मिळविणे!

जर तुम्हाला 2021 चा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर भरपूर पैसा रिफंड आला असेल तर त्या पैशांचा योग्य वापर करण्यासाठी पुढे दिलेल्या 5 मार्गांची मदत घ्या आणि जर तुम्ही अजूनही ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा याचा विचार करत असाल तर हा लेख जरूर वाचा.

त्या पैशांची बचत करा

पैशांची बचत करणे हे सकस आहार घेण्यासारखे असते – तुम्ही नियमितपणे बचत नक्की करू शकता पण एखादी अनियोजित खरेदी (बरेचदा अनावश्यक खरेदी) या बचतीच्या मार्गात येऊ शकते.

अशा मोहाच्या क्षणापासून दूर राहणे खूप कठीण असते, त्यामुळे रिफंड आलेला पैसा लपवून ठेवला तरच तो जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हा उपलब्ध होईल यासाठी एक उत्तम पर्याय असतो.

उत्तम पर्याय… तो कोणता? हा पैसा तुम्ही ज्या बँकेच्या खात्यातून विशेष दैनंदिन व्यवहार करत नाही अशा खात्यात हस्तांतरीत करून घ्या.

जर हा रिफंड तुम्ही तुमच्या नजरेआड ठेवलात तर तुम्ही त्या पैशाचा वापर करून होणारी अनियोजित खरेदी सहजपणे टाळू शकता. 

आपत्कालीन वापरासाठी पैसे बाजूला ठेवा

अनेकदा आपत्कालीन निधीची गरज पडते. नोकरी गमावणे, आजारपण, किंवा इतर अनपेक्षित खर्चासाठी आकस्मित निधीची आवश्यकता असते.

रिफंड आलेल्या पैशांचा वापर जर तुम्ही अनपेक्षित खर्चाच्या वेळी केलात तर तुमच्या आर्थिक परिस्थितीत तुम्ही सर्वोच्च ठिकाणी असू शकता. कारण यामुळे तुमच्याकडे कायमच एक  बॅक-अप योजना उपलब्ध असते.

तुम्ही अनपेक्षित वैद्यकीय गरजेसाठी किंवा अचानक कराव्या लागणाऱ्या घराच्या दुरुस्तीसाठी आकस्मिक निधीचा वापर करू शकता, कदाचित या पैशांच्या अभावी तुम्हाला भरपूर व्याज दर असणारे अल्पावधीचे कर्जही काढावे लागू शकते.

कर्जाची परतफेड करा

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुमचे उत्पन्न हातात आल्या आल्या जर तुम्हाला कर्जासाठी अतिरिक्त पैसे/हप्ते द्यावे लागत असतील तर कर्जाचे हे ओझे त्रासदायक वाटू शकते.

यामध्ये तुमच्या फोनचा दीर्घ मुदतीचा मासिक हप्ता असू शकतो, परदेश सहलीसाठीचे अल्प मुदतीचे कर्ज असू शकते किंवा एखादे क्रेडीट कार्डचे थकलेले बिलही असू शकते.

जर तुम्ही अशाप्रकारची कर्जे काढली असतील तर तुमचा रिफंड या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणे या सर्वोत्तम पर्याय आहे.

कारण, तुम्ही 2% व्याज देणार्‍या फंडात 30,000 रुपये गुंतवले आणि क्रेडिट कार्डची  शिल्लक 27,000 रुपये असेल, ज्यावर 18% व्याजाने शुल्क आकारले जात असेल तर या व्यवहाराला काहीही अर्थ नाही.

जर तुमच्याकडे एकाहून अधिक कर्जे असतील तर त्या कर्जाचा त्यांच्या व्याजदरानुसार प्राधान्यक्रम ठरविणे हुशारीचे ठरेल.

ज्या कर्जाचे व्याज सर्वाधिक आहे आणि त्यावर कोणताही करविषयक फायदा मिळत नाही तर त्या कर्जाच्या परतफेडीचा त्वरीत विचार करायला हवा.

सेल्फ-इन्शुरन्स पॉलिसी/ स्व-विमा योजना खरेदी करा

तुम्ही विशीचे असाल, तर तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिफंड वापरून लाईफ इन्शुरन्स/जीवन विमा खरेदी करण्याचा विचार केलेला नसणार! परंतु, तसे का केले पाहिजे हे जाणून घ्या.

सुरुवातीपासून जर तुम्ही टर्म लाइफ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण मिळू शकते.

आणि जर तुम्ही विवाहित असाल, तर इन्शुरन्स करणे अधिक अर्थपूर्ण आहे कारण ते तुमच्या सर्व प्रियजनांना जीवनातील कोणत्याही अनपेक्षित आपत्तीपासून संरक्षण देते.

या वर्षी जर तुमचा रिफंड भरपूर असेल तर तुम्ही एका वेळी संपूर्ण रक्कम देऊन घेता येणारा टर्म लाइफ इन्शुरन्स निवडू शकता.

या लाईफ इन्शुरन्ससाठी तुम्हाला फक्त एकदाच पैसे द्यावे लागतील आणि तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंतचा काळ संरक्षित केला जाईल.

इतरांसाठी इन्शुरन्स पॉलिसी तयार करा आणि तुमच्या रिफंडचा पैसा सुरुवातीची रक्कम/सीड मनी म्हणून वापरा. या खर्चाला सामावून घेणारे बजेट तयार करा.

सेवानिवृत्तीसाठी बचत करा

तुमच्या सेवानिवृत्तीच्या काळासाठी अर्थात सोनेरी वर्षांसाठी या रिफंड आलेल्या पैशांची बचत करणे हा उत्तम मार्ग आहे.

जर शक्य असेल तर हे पैसे सेवानिवृत्ती फंड खरेदी करण्यासाठी किंवा त्यात भर घालण्यासाठी वापरले गेले पाहिजेत जेणेकरून ते पैसे जेव्हा भविष्यकाळात तुम्ही नोकरी करत नसाल त्या काळासाठी सुरक्षित राहतील.

जेव्हा उतारवयात तुम्ही हे अतिरिक्त पैसे सेवानिवृत्ती निधी म्हणून साठवलेले असताना पाहाल तेव्हा तुम्हाला नक्कीच धन्यता वाटेल. अन्यथा साधारणपणे या पैशांचा वापर अनाठायी खरेदी करण्यासाठी केला जाईल.

‘पैसा हुशारीने कसा वापरावा?’ या प्रश्नाचे हे एक उत्तम उत्तर आहे!

शेवट करण्यापूर्वी…

तुम्ही हे सर्व पैसे बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरण्याच्या मनस्थितीत नाही? मग ते इतर अनेक मार्गांनी खर्च करू शकता.

आणि तसेही, कोण म्हणतो खर्च करणे वाईट आहे जर खर्चाच्या बदल्यात तुम्हाला डिजिटल सोने मिळणार असेल! Jar मध्ये, आम्ही तेच तर करतो.

त्यामुळे, Jar ॲप वापरून खर्च करा, त्यावरून तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा भागवू शकता आणि डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. 

आता, हे खरोखर हुशारीने खर्च करण्यासारखे नाही का ? 

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.